वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकचा फलंदाज सोहेब मक्सूद आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून त्याच्याऐवजी शोएब मलिकचा या संघात समावेश केला गेला आहे.
राष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या सामन्यात खेळताना सोहेब मक्सूदला पाठदुखीची समस्या सुरू झाली. या दुखापतीनंतर त्याला गुरूवारच्या सामन्यात खेळता आले नाही. आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत पाकचा गट-2 मध्ये समावेश असून त्यांचा भारताविरुद्धचा सामना 24 ऑक्टोबरला दुबईतील स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या गटामध्ये अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पात्र फेरीतील दोन संघांचा समावेश आहे.
पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), शोएब मलिक, असिफ अली, फक्र झमान, हैदर अली, हॅरिस रॉफ, हसन अली, इमाद वासिम, मोहम्मद हाफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, खैबर, मोहम्मद वासीम ज्युनियर, सर्फराज अहमद, शाहीन अफ्रिदी.