सुदैवाने दोघेजण बचावले : सायकल-दुचाकीचेही नुकसान : धामणे येथील दुर्घटना
वार्ताहर / धामणे
धामणे येथे जुनाट विद्युत खांबाला गवताने भरलेल्या ट्रक्टरची धडक बसून विद्युत खांब कोसळल्याने दुचाकी आणि सायकलीचे नुकसान झाले. सुदैवाने जवळच कट्टय़ावर बसलेले दोघेजण थोडक्मयात बचावले.
पावसाळय़ापूर्वी जनावरांचा चारा जमा करण्यास शेतकरी वर्गाची लगबग सुरू असते. धामणे परिसरातील शेतकरी पावसाळय़ापूर्वी शेतातील गवत ट्रक्टरच्या सहाय्याने आणण्याचे काम सुरू आहे. मंगळवार दि. 27 रोजी सकाळी 7.30 वाजता गवताने भरलेला ट्रक्टर कलमेश्वर मंदिर शेजारील कल्लाप्पा सुणगार यांच्या घराच्या बाजूला रस्त्याशेजारी जुन्या विद्युतखांब होता. या खांबाला ट्रक्टरचा धक्का बसल्याने दुचाकी मोटारसायकल व सायकलवर पडल्याने सायकल व मोटरचे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून फरशीच्या काठावर बसलेले सुनील सुणगार यांच्या फक्त काही अंतरावर हा खांब पडल्याने ते बचावले.
खांब पडला त्या ठिकाणी दोन दुकाने असल्याने येथे नागरिकांची जास्त वर्दळ असते. परंतु याचवेळी वर्दळ कमी होती. त्यामुळे अनर्थ टाळला. गेल्या दोन वर्षापूर्वी धामणे व कुरबरहट्टी, मासकोनहट्टी, देवगणहट्टी येथे हेस्कॉमने या भागात नव्याने विद्युतखांब उभा करून जुन्या खांबावरील विद्युततारा नवीन खांबावर जोडल्या असल्याने या भागात जुने विद्युतखांब अनेक ठिकाणी उभे केल आहेत तर काही ठिकाणी तसेच ठेवण्यात आले आहेत. हे जुने खांब आता धोकादायक ठरत आहेत. पुढील अनर्थ टाळण्यासाठी ग्रा. पं. ने पुढाकार घेऊन जुने खांब काढावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.