मनपूर्वक प्रयत्न अन् कष्ट करणाऱया लोकांना कधीच हार पत्करावी लागत नसल्याचे बोलले जाते. त्यांना त्यांचे ध्येय अवश्य गाठता येते. पंजाबच्या एका महिलेने स्वतःचे स्वप्न साकार करून अशक्य काहीच नसल्याचे जगाला दाखवून दिले आहे. या महिलेचे नाव मनदीप कौर सिद्धू असून ती न्यूझीलंड पोलीस दलात भरती होणारी पहिली भारतीय महिला आहे.
प्रवास सोपा नव्हता
पंजाबच्या मानसानजीकच्या कमालू गावात मनदीप राहत होते. तेथून ती प्रथम चंदीगडला गेली, त्यानंतर तिचा विवाह झाला, मुलंही झाली. मनदीपला हळूहळू कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्य उचलावी लागली. 1996 मध्ये तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले.
तेथेच शिक्षण
ऑस्ट्रेलियात मनदीपने शिक्षण पूर्ण केले. काही वर्षांनी ती न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाली. तेथे ती पूर्वी पेट्रोलपंपावर काम करायची. तसेच विक्रीविषयक कामेही तिने केली. घरोघरी जाऊन ती उत्पादने विकत होती. तिचे इंग्रजीचे ज्ञान फारसे चांगले नव्हते. पण तिच्यात शिकण्याची जिद्द होती.
टॅक्सी चालविण्यास प्रारंभ
1999 मध्ये न्यूझीलंडमध्ये गेलेल्या मनदीपने तेथे टॅक्सी चालविण्यास सुरुवात केली. तेथे ती वायएमसीए वुमन लॉजमध्ये राहत होती. हे लॉज ऑकलंडमध्ये होते. तेथे जो हे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायचे. त्यांचे जॉन पेगलर होते आणि ते निवृत्त पोलीस कर्मचारी होते.
वडिलांसारखेच
पेगलर यांना मनदीत स्वतःचे ‘कीवी वडिल’ म्हणते. जेव्हा ती कामावरून थकून यायची तेव्हा पेग्लर तिच्याशी बोलायचे आणि तिला हॉट मिलो तयार करून द्यायचे. पेगलर मनदीपला स्वतःच्या पोलीस सेवेतील गोष्टी सांगायचे. एकेदिवशी मनदीपने पेगलर यांच्याकडे पोलीस दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. मनदीपने पोलीस होण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचे वजन 20 किलोंनी कमी केले. प्रचंड मेहनत घेतली. 2002 मध्ये तिची मुलेही न्यूझीलंडमध्ये आली. त्याच्या दोन वर्षांनी तिने न्यूझीलंड पोलीस दलात प्रवेश केला.
पहिली भारतीय महिला
जेव्हा तिने पोलीस दलात प्रवेश केला होता तेव्हा ती सीनियर कॉन्स्टेबल होती. तर आता ती सीनियर सार्जंट आहे. या पदावर पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला आहे.