मार्ग सुलभ करून देण्याची केली मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून व्यवसाय नाही. काही दिवसांपूर्वी आम्हाला टॅक्सी सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र व गोव्यातील पोलिसांकडून नाहक त्रास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आपण तेथील अधिकाऱयांशी संपर्क साधून आम्हाला होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी जिल्हा टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी आरटीओ शिवानंद मगदूम यांच्याकडे केली आहे.
गुरुवारी आरटीओ कार्यालयात त्यांनी मगदूम यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रवासी घेऊन गेल्यानंतर यलो कार्ड बसवावे, असा आग्रह धरण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी घेण्यात येणारे शुल्क परवडणारे नाही. वर्षाला 10 हजार ते 12 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे ट्रक्सी मालक व चालकांना त्याचा मोठा फटका बसणार असून त्यामुळे या करात कपात करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातील चार चाकी वाहने अडवून त्या टॅक्सी चालकांना दडपशाही करण्यात येत आहे. सहा प्रवाशांसाठी 1600 रुपये, तीन महिन्याला तर सात प्रवाशांसाठी 4 हजार रुपये, 30 प्रवाशांसाठी 10 हजार रुपये अशा प्रकारे कर भरावा लागत असल्याने आपला व्यवसाय अडचणीत सापडला आहे. याकडे आरटीओंनी गांभीर्याने लक्ष द्यावे व करात कपात करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र, गोवा आणि कारवार जिह्यातील पोलीस टॅक्सी चालकांना नाहक त्रास देत आहेत. तो थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी जिल्हा टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्यावतीने करण्यात आली होती. आता आरटीओ यांची भेट घेऊन करात कपात करावी व महाराष्ट्र आणि गोव्यात होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आरटीओ यांनी आपल्या मागणीकडे आपण लक्ष देऊ. मात्र नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करावा, त्यासाठी लागणारे परवाने घ्यावेत. सध्या ही आपली मागणी वरि÷ांकडे पाठवून देऊन त्यावर विचारविनिमय केला जाईल. आपल्या मागणीचा आपण विचार करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी टॅक्सी ऑनर्स असोसिएशनला दिले आहे. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.