प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव टॅक्सी मालक आणि चालक असोसिएशनतर्फे गरीब व गरजू रुग्णांसाठी 24 तास रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांच्या हस्ते फीत कापून या रुग्णवाहिकेला चालना देण्यात आली. अल्पदरात ही रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर बसुर्तेकर, उपाध्यक्ष नजीर सुरकोड, सदस्य सुरेश अरळीकट्टी, चंद्रू, मंजू, नंदू सुतार, लक्ष्मण, आनंद, सूरज, अभिषेक, शहापूरकर, आनंद, हर्षल, धनंजय आदी असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रादेशिक परिवहनचे कचेरी अधिकारी शरणाप्पा हुग्गी यांनी स्वागत करून परिचय करून दिला.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी
टॅक्सी मालक-चालक असोसिएशनतर्फे ही रुग्णसेवा सुरू करण्यात आल्याने अनेक गरिबांना आधार मिळणार आहे. ज्या रुग्णवाहिका अनागोंदी रक्कम आकारत आहेत, अशा रुग्णवाहिकांबद्दल तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तसेच या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
गरजूंनी रुग्णवाहिकेसाठी 9379020606 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.