सुनील राजगोळकर
धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात विश्रांतीचे विरंगुळय़ाचे आनंद देणारे क्षण आता साऱयांनाच हवेसे वाटतात. दोन-चार दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिप्रेश व्हावे, यासाठी अनेकजण आज सहल, ट्रीप, टूर, सायकल प्रवास, टेकिंग करताना दिसतात. अशाप्रकारे बेळगाव रूक्मिणीनगर येथील एका विद्यार्थ्यांने नुकतीच संरकी (झारखंड) हिमालय पर्वतावर टेकिंग मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
जीआयटी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्समधील प्रथम वर्षात शिकणाऱया या विद्यार्थ्यांचे नाव हर्ष महिंद्रकर असे आहे. बऱयाच जणांचे सुट्टीच्या दिवशी घरी पाय टिकतच नाहीत. त्या दिवशी काही तरी नवनवीन छंद जोपासत असतात. भल्या भल्यांचे फक्त व्हिडीओ आणि फोटो बघून पर्वतावर जाण्याचे धाडस होत नाही, अशा संरकी (झारखंड) येथील 2770 मीटर उंची असलेल्या पर्वतावर चढण्याची मोहिम लिलया हर्षने चार दिवसात पूर्ण केली. त्यांची ही मोहीम इतर युवकांना आदर्श व प्रेरणादायी ठरेल.
व्हिडिओपासून घेतली प्रेरणा
कोणतेही मार्गदर्शन नसताना हर्षने केवळ यू-टय़ूबवर बघितलेल्या एका व्हिडीओची प्रेरणा घेऊन हिमालयात जाऊन ट्रेकिंग करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्याचा आत्मविश्वास वाढला आणि पाच दिवसांचा पल्ला त्याने चार दिवसात पूर्ण केला. हर्षने एका कंपनीव्दारे ऑनलाईन नोंद करून संरकी झारखंड येथे जाण्यासाठी दि. 31 डिसेंबर ही तारीख निश्चित केली. बेळगाव ते मुंबई (बसने प्रवास), मुंबई ते दिल्ली (विमानाने प्रवास) परत दिल्ली ते संरकी (झारखंड) कारने प्रवास करत आपल्या मोहिमेला सुरूवात केली.
हर्षने आपल्या पाच दिवसाच्या खडतर प्रवासाला संकरी झारखंड येथून सुरूवात केली. पहिल्या दिवशी ‘जुडा का तलाव’ हा 4 किलोमीटरचा व 2770 मीटरचा उंची असलेला प्रवास त्यांने लिलया पार केला. त्यानंतर दुसऱया दिवशी टेकिंगला जुडा का तलाव ते केदार कंठा बेस कॅम्प असा 11250 फूट उंचीच्या पर्वतावर पोहचला. हा नियोजित पाच दिवसाचा प्रवास चार दिवसात पूर्ण करून शिल्लक राहिलेल्या एका दिवसात हरिव्दार येथे जाऊन दर्शन घेतले. संरकी या 12500 फूट उंच हिमशिखरावर बेळगाव येथून जाऊन मजल मारली. दि. 3 जानेवारी रोजी सुरूवात केलेल्या प्रवास मोहिम दि. 7 जानेवारी रोजी संपली.
हिमालयात प्रथमच ट्रेकिंग
हिमालयात पहिल्यांदाच टेकिंग करत असल्यामुळे मनात आनंद होता पण भीती पण होती. टेक कसा निवडावा, तो कोणासोबत करावा, तो करताना कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी कशी तयारी करावी, असे प्रश्न मनात घर करून होते. मात्र एकदा मोहिमेला सुरूवात झाली आणि आत्मविश्वास वाढला आणि बघता बघता मोहीम यशस्वी झाली. टेकिंग करताना शारीरिक क्षमतेची गरजेची आहे. येथील स्थानिक गाईड घेऊन टेकिंगला सुरूवात करत ही मोहीम यशस्वी केली.&