ऍपलचे सीईओ टीम कुकना लाभ
वृत्तसंस्था /टेक्सास
आयफोन निर्मिती करणारी अमेरिकेतील कंपनी ऍपलचे सीईओ टीम कुक यांना 2021 हे वर्ष जबरदस्त ठरले आहे. या वर्षात टीम कुक यांच्या वेतन पॅकेजमध्ये भरभक्कम वाढ झाल्याचे दिसले आहे.
टेक कंपनीत काम करणाऱया एका कर्मचाऱयाच्या वेतनाच्या तुलनेत 1 हजार 447 पट अधिक वेतन सीईओ टीम कुक यांना मागच्या वर्षी मिळाले आहे. येथील कर्मचाऱयांना सरासरी वेतन 68.254 डॉलर इतके असते.
किती मिळाले वेतन 2021 मध्ये कुक यांना पॅकेजअंतर्गत 98.7 दशलक्ष डॉलर वेतन मिळाले आहे. यामध्ये सॅलरीअंतर्गत 3 दशलक्ष डॉलर, स्टॉक अवॉर्डमधून 82.4 दशलक्ष डॉलर, एअर ट्रव्हलमधून 12 दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. 2020 मध्ये टीम कुकना वेतन पॅकेजरुपात 14.8 दशलक्ष डॉलर मिळाले होते. ऍपलचा समभाग 1 हजार अंकांनी बाजारात वधारल्याचे दिसले आहे.