नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी टेक महिंद्राने 12.5 कोटी डॉलर्समध्ये अलिस इंडिया आणि ग्रीन इन्वेस्टमेन्ट्समध्ये 100 टक्के हिस्सेदारी अधिग्रहणाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. टेक महिंद्राकडून शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यासोबतच सदरच्या अधिग्रहणामुळे डिजिटल सुविधांचा वेगळा अनुभव मिळणार आहे. तसेच कंपनीची क्षमता वाढविण्यावरही भर देणार असल्याचे संकेत आहेत. ग्रीन इन्वेस्टमेंट्स एलएलसी, अलिस इंडियाची होल्डिंग कंपनी आहे. अलिसचे मुख्यालय हे अमेरिका येथील सिएटलमध्ये आहे. यामध्ये जवळपास 660 पेक्षा अधिकचे कर्मचारी कार्यरत आहेत.