प्रतिनिधी / बेळगाव
डीजे बॉईज आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीजे बॉईज संघाने कामत गल्ली संघाचा पराभव करून डीजे चषक पटकाविला.
धोबीघाट येथील मेजर बी. ए. सय्यद मैदानावर घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीजे बॉईज संघाने 10 षटकात 6 बाद 87 धावा केल्या. महेशने 18, आनंदने 15 तर प्रशांतने 10 धावा केल्या. कामत गल्लीतर्फे योगेश व कपिल यांनी प्रत्येक 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल कामत गल्ली संघाने 10 षटकात सर्व बाद 40 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विनोद कडोलकर, माजी नगरसेविका माया कडोलकर, भरमा कोळी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर महेश कदम, उत्कृष्ट फलंदाज दिनेश पुजारी, उत्कृष्ट गोलंदाज कपिल, उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ आझाद गल्ली तर मालिकावीर म्हणून प्रतीक बाळेकुंद्री यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डीजे बॉईजच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.