टोकियो : जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचच्या ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात बोलिव्हियाच्या हय़ुगो डेलीयनविरुद्ध होणार आहे. गोल्डन स्लॅम पटकावण्याचे उद्दिष्ट ठेवून तो या स्पर्धेत उतरला असून येथे सुवर्णपदक आणि नंतर होणारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याला जिंकावी लागणार आहे. यात यश मिळाल्यास गोल्डन स्लॅम पटकावणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरेल. महिलांमध्ये हा पराक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने 1988 मध्ये केला होता. जोकोविचने ऑस्ट्रेलिया, पेंच व अलीकडेच विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून त्या दिशेने वाटचाल केली आहे. या ऑलिम्पिकमध्ये 46 देशांच्या टेनिसपटूंनी भाग घेतला असून शनिवारपासून या क्रीडाप्रकाराला सुरुवात होणार आहे. ब्रिटनचा अँडी मरेही सलग तिसऱयांदा सुवर्णपदक मिळविण्यासाठी उत्सुक असून त्याची सलामी कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेशी होणार आहे.
Previous Article‘बलोच’चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
Next Article 18 वर्षीय युवती, 144 वर्षांचे शरीर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.