बाफ्ता पुरस्कारांच वितरण
द ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्ता) अवॉर्ड्स 2021 चा शुभारंभ शनिवारी म्हणजेच 10 एप्रिलपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार 11 एप्रिल) झाला आहे. पहिल्या दिवशी 25 पैकी 8 शेणींमधील पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
सोहळय़ाच्या पहिल्या दिवशी साउंड, कास्टिंग, कॉस्टय़ूम डिझाइन, मेकअप अँड हेयर, प्रॉडक्शन डिझाइन, ब्रिटिश लघुपट, ब्रिटिश ऍमिनेशनपट आणि स्पेशल ^व्हिज्युअल इफेक्ट्स शेणींकरता पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘मा रैने ब्लॅक बॉटम’ला दोन पुरस्कार मिळाले आहेत.
लोकप्रिय अमेरिकन दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ‘टेनेट’ला स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स शेणीत पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचबरोबर अन्य शेणींमध्येही टेनेटने पुरस्कार मिळविला आहे. द प्रेजेंट हा सर्वोत्तम ब्रिटिश लघूपट ठरला आहे.