प्रतिनिधी/ बेळगाव
टेम्पररी वीजमीटर घेतल्यानंतर त्याची माहिती ग्राहकाला नसल्याने त्याचा नाहक दंड भरावा लागत आहे. अशा घटनांची संख्या वाढली असून ग्राहकांना दुप्पटीने दंड भरावा लागत आहे. त्यामुळे टेम्पररी मीटर देताना हेस्कॉमचे कर्मचारी तसेच कंत्राटदारांनी ग्राहकाला माहिती देणे गरजेचे आहे. शनिवारी झालेल्या तक्रार निवारण बैठकीत टेम्पररी मीटरबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
कर्नाटक विद्युत मंडळाच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱया शनिवारी तक्रार निवारण बैठकीचे आयोजन करण्यात येते. शनिवारी शहर कार्यालय 2 मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. घर बदलल्यानंतर मीटर बंद न करताच तो 2 वर्षे सुरू राहिल्याने त्याचा दंड ग्राहकांना भरावा लागला. घरामध्ये आपले स्वतःचे ऑफीस थाटल्यामुळे हेस्कॉमतर्फे आक्षेप घेण्यात आला होता. परंतु त्यांचा वापर कमी प्रमाणात असल्याने ही तक्रार मागे घेण्यात आली.
या बैठकीला संदीप किणेकर, सेक्शन ऑफिसर जगदीश मोहिते, बी. बी. हैबत्ती, अश्विनी आमाषे, राहुल शिंदे यासह कंत्राटदार व कर्मचारी उपस्थित होते.