मिरजेत महात्मा फुले चौकात अपघात, एक बालक गंभीर जखमी
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील महात्मा फुले चौक रस्त्यावर आयशर टेम्पोने धडक दिल्याने आठ वर्षाचा बालक जागीच ठार झाला. आर्यन कुचीकोरवी (वय 8) असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. तर रोहित तायापा शिंदे (वय 7) हे बालक गंभीर जखमी झाले असून, त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आह
सोमवारी सायंकाळच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आयशीयर टेंपोची तोडफोड केली. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात नोंद झाली आहे.