कागवाड-शिरगुप्पी रस्त्यावरील घटना : चौघे जण जखमी
प्रतिनिधी/ कागवाड
बेळगाव-सांगली महामार्गावरील कागवाड-शिरगुप्पीमध्ये मंगळवारी मध्यरात्री 12:30 वाजता झालेल्या टेम्पो व ट्रक्टर यांच्यात झालेल्या अपघातात तरुण ठार झाला असून, चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. परशुराम मारुती पाटील (34), राहणार नरवाड, ता. मिरज असे मृताचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, मिरज तालुक्मयातील नरवाड येथील परशुराम मारुती पाटील हे टेम्पोमधून साहित्य बेळगाव येथे पोहचवून परत येत असताना कागवाड येथील शिरगुप्पीकडे ट्रक्टरमधून ऊसतोड मजुरांना घेऊन जात होते. यावेळी टेम्पो व ट्रक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक परशुराम पाटील जागीच ठार झाले तर 4 मजूर जखमी झाले. या टेम्पोतून 20 मजूर प्रवास करत होते.
घटनेची माहिती कळताच कागवाडचे पी. एस. आय हनुमंत धर्मट्टी व त्यांचे सहकारी काडप्पा चंदुरे, जी. ए. सोनवणे, एस. बी. मुरगुड, ए. व्ही. मोळे आदींनी जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले आहे.
कागवाड-बेळगाव या राज्य महामार्गावर रस्ता अरुंद असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. सध्यातरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू असून वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी वरि÷ अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत. तसेच या मार्गावर पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.