अमेरिकन पॉप स्टार टेलर स्विफ्टने नोव्हेंबरमध्ये ‘फियरलेस’च्या यशानंतर ‘रेड’ अल्ब पुन्हा रिकॉर्ड करून प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. टेलरने स्वतःचा चौथा स्टुडिओ अल्बम ‘रेड (टेलर्स व्हर्जन)’ 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
या अल्बममध्ये 30 गाणे असणार आहेत. यातील एक गाणे ‘ऑल टू वे’चे नवे व्हर्जन असू शकते. प्रेमभंग झालेल्या लोकांसाठी जग एक वेगळेच स्थान आहे. हे जग त्यांच्यासाठी एका वेगळय़ाच वेगाने चालते. प्रेमभंग झालेला व्यक्ती एका दिवसात हजारो प्रकारच्या भावना अनुभवू शकतो असे टेलरने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘रेड’ अल्बममुळे मला प्रेमभंगाच्या स्थितीतून बाहेर पडण्यास मदत मिळाली होती. एका नव्या जीवनाच्या तुकडय़ांना सावरण्याच्या प्रयत्नात स्टुडियोमध्ये जात अनेक प्रकारच्या साउंड आणि कोलॅबोरेटर्ससोबत प्रयोग केले. रेडच्या निर्मितीवेळी लिखाण थांबवू शकले नव्हते आणि अखेरीस सर्व 30 गाणी शेअर करत असल्याचे स्विफ्टने नमूद केले आहे.