साताऱयातील प्रकार – आरोग्य विभागाचा ढिसाळपणा समोर
प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोना संपत नसल्याने जिल्हय़ातील नागरिक पॅनिक आहेत. आरोग्य विभागाकडून चांगले काम सुरु असले तरी त्यात ढिसाळपणा आला आहे. त्यामुळे आकडेवारीचे घोटाळे समोर येत असतानाच साताऱयातील एका युवकाला त्याने आरटीपीसीआर टेस्ट केलीही नसताना त्याला तू पॉझिटिव्ह असल्याचा फोन आल्याने युवक चांगलाच गोंधळला आणि घाबरला देखील. सिव्हिलमध्ये चौकशी केली पण त्याला अनागोंदी उत्तरे आणि सर्दीवरच्या गोळय़ा मिळाल्या.
साताऱयातील एकाने दि. 9 ऑगस्ट रोजी त्याला त्रास होत नसल्याने रॅट अँटीजन टेस्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली. त्यात तो पॉझिटिव्ह आला. मग त्याने त्याला फारसा त्रास नसल्याने 14 दिवस घरातच काढले. पुन्हा कॉलेजला जायचे असल्याने त्याने 25 रोजी पुन्हा रॅट अँटीजन टेस्ट केली. तेव्हा त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मग तो कॉलेजवर गेला. इतर अनेकांना भेटू लागला.
दि. 26 रोजी त्याला आरोग्य विभागाकडून 15 ते 16 फोन आले. आरोग्य विभागाने तुमची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे सांगितल्यावर युवक जाम घाबरला. कारण त्याने आरटीपीसीआर टेस्ट केलीच नव्हती त्याने तसे सांगितलेही पण आरोग्य विभागाने त्याला तुम्ही कण्हेर आरोग्य केंद्रावर टेस्ट केल्याचे सांगितले. पण सातारचा हा युवक टेस्ट करण्यासाठी कण्हेरला गेलाच नव्हता.
शेवटी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे चौकशी केली तर तेथील एकाने त्याला तुमची रॅट घेतानाच त्याच नमुन्यात आरटीपीसीआर टेस्ट केली असल्याचे सांगितले. मात्र, रॅटचा नमुना सिव्हिलमध्ये आणि त्याची आरटीपीसीआर कण्हेर आरोग्य केंद्रावर दाखवण्यात आलीय. त्यावेळी युवकाने त्यांच्याकडून सर्दीच्या गोळय़ा घेतल्या अन तो घरी आला. मात्र, दि. 29 रोजी त्याने हा प्रकार तरुण भारत ला सांगितला. आता आरोग्य विभागाच्या कामाला नेमके काय म्हणायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
प्रचंड भीती वाटली, हा प्रकार थांबवा
वास्तविक माझी रॅट टेस्ट निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र त्याच्याकडे आहे. त्यामुळे कॉलेजमध्येही गेला. आणि अचानक पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केलीच नसताना आरोग्य विभागाचा फोन आल्याने मी घाबरलो. मला काही त्रास नाही पण मी अनेकांना भेटला होतो. मात्र, मी कण्हेर आरोग्य केंद्रात गेला नसताना तिथे मी नमुना दिला आणि माझा अहवाल बाधित कसा आला हा प्रश्न त्याला पडला असल्याच्s युवकाने सांगितले.