प्रतिनिधी / कोल्हापूर :
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत टेस्टींग वाढवल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढली होती. रविवारी टेस्टींग कमी झाले, परिणामी नव्या रूग्णांत घट झाली रविवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 637 नवे रूग्ण आढळून आले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 780 वर पोहाचली. दिवसभरात कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 350 जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 651 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 485, नगरपालिका क्षेत्रात 689, शहरात 958 तर अन्य 519 आहेत. दिवसभरात 1 हजार 350 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 36 हजार 525 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 637 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 65, भुदरगड 42, चंदगड 24, गडहिंग्लज 31, गगनबावडा 1, हातकणंगले 270, कागल 39, करवीर 349, पन्हाळा 119, राधानगरी 55, शाहूवाडी 43, शिरोळ 71, नगरपालिका क्षेत्रात 116, कोल्हापुरात 379 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 52 हजार 956 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 18 हजार 954 अहवाल आले. त्यापैकी 17 हजार 318 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 611 अहवाल आले. त्यातील 4 हजार 237 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 13 हजार 420 अहवाल आले. त्यातील 12 हजार 548 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 914 रिपोर्ट आले. त्यातील 533 निगेटिव्ह आहेत.
शहरात कोरोनाने 11 जणांचा मृत्यू,
परजिल्ह्यातील मत्तीवडे बेळगाव व हरीपूर सांगली येथील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये फुलेवाडी, नवीन वाशी नाका, साने गुरूजी वसाहत, आर. के. नगर, राजारामपुरी, शिवाजी पेठ, देवणे गल्ली, राजारामपुरी, फुलेवाडी, ताराबाई पार्क, ए. वॉर्ड शिवाजी पेठ येथील व्यक्तींचा समावेश आहे.
टेस्ट | संख्या | पॉझिटिव्ह रूग्ण |
आरटीपीसीआर टेस्ट | 4611 | 374 |
ऍटीजेन टेस्ट | 13420 | 882 |
ट्रुनेट टेस्ट | 914 | 381 |
एकूण टेस्ट | 18945 | 1637 |
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 379 1258 1637
आजपर्यतचे बाधीत 42465 1,10,491 1,52,956
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1350 1,36,525
दिवसभरातील मृत्यू 11 22 33
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 958 3693 4651
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 374 4237 4611
अँटीजेन 882 12548 13420
ट्रुनेट 381 533 914
सक्रीय रूग्ण 11780
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 89.77 टक्के
एकूण चाचण्या रविवार ः 18955 एकूण 10,67,801
मृतांची संख्या ः 33 जिल्हा ः 30 बाहेरील ः 3
दीर्घकालीन व्याधी 13 2
60 वर्षावरील 17 1
पहिल्या 48 तासांत मृत्यू 8 1
आजअखेर मृत संख्या 4651 जिल्हा ः 4132 अन्य ः 519
33 बळी, 1637 नवे रूग्ण, 1350 कोरोनामुक्त
कोरोना रूग्ण 1637 ः एकूण ः 1,52,956
कोरोनामुक्त 1350 ः एकूण ः 1,36,525
कोरोना मृत्यू 33 ः एकूण मृत्यू ः 4651
सक्रीय रूग्ण ः 11780
जिल्ह्यात म्युकरचे 4 नवे रूग्ण, 45 जणांना डिसचार्ज
जिल्ह्यात रविवारी, म्युकर मायकोसीसचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. म्युकरमुक्त 45 जणांना घरी पाठवण्यात आले.
शहरातील सीपीआरमध्ये रविवारी म्युकरचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. सीपीआरमधून 27 आणि खासगी हॉस्पिटलमधून 18 अशा 45 म्युकरमुक्तांना डिस्चार्ज दिला. सध्या सीपीआरमध्ये 100 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 50 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.