सरकारसोबत मार्ग काढण्यासाठी चर्चा : आयात शुल्क 40 टक्के आकारण्याची मागणी
नवी दिल्ली
भारतामध्ये टेस्लाची कार सादर होण्यास आणखीन कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून आम्ही भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार उतरवणार असल्याची चर्चा होती. परंतु यामध्ये अनेक अडचणी असल्याचे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सांगितले आहे.
भारतीय बाजारात टेस्लाची कार आणण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी असून त्यामध्ये विविध टप्प्यावर कंपनी येणाऱया अडचणीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये भारत सरकारसोबत मिळून हा प्रयत्न होत असल्याचेही टेस्लाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गाडीला लक्झरी नव्हे तर ईव्ही माना
टेस्लाने पूर्णपणे असेंबल गाडय़ावर आयात शुल्क घटवून 40 टक्के करण्याची मागणी केली आहे. यामध्ये 40,000 डॉलरपर्यंत स्वस्त गाडीवर 60 टक्के आणि त्यापेक्षा महाग असणाऱया गाडीवर 100 टक्के आयात शुल्क लावले जात आहे. कंपनीने सदरच्या गाडय़ा या लक्झरी नव्हे तर इलेक्ट्रिक व्हेईकल्स गटात मोडत असल्याचे मुद्दामहून नमूद केले आहे.
आयात शुल्क माफ नाही ?
सरकारने काही महिन्यापूर्वी, बाहेरुन मागविल्या जाणाऱया कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क माफ करण्याचा कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले होते.
भारतात घडी बसवणे टेस्लाला कठीणच
टेस्लासाठी भारतीय बाजारातील सूर सापडणे कठीणच आहे. याची काही विशेष कारणे आहेत. यामध्ये पहिले कारण असे आहे, की यात प्रत्येक वर्षाला जितक्या गाडय़ा विकल्या आहेत. त्यामध्ये फक्त एक टक्का इलेक्ट्रिक असतात. तर टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाडय़ा खुप महाग असल्यामुळे सामान्य ग्राहकांनाही विकत घेणे परवडणारे नाही. तिसरी बाब अशी आहे, की देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा केंद्रे अजुनही कमीच आहेत. तसेच दुसरी बाब आयात होणाऱया वाहनांवर अधिकचा कर आकारला जात असल्याचाही प्रभाव राहणार असल्याची माहिती
आहे.