प्रतिनिधी / सातारा :
विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी धुळे येथे आंदोलन करत असताना धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सतार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जोरदार मारहाण केल्याचा निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सातारा जिह्यातून सरकारच्या विरोधात या मारहाणीचा निषेध सोशल मीडियातून नोंदवला जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथे काल विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्री अब्दुल सतार यांच्या वाहनांचा ताफा येताच त्यांच्या वाहनच्या पुढे आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांना पालकमंत्री अब्दुल सतार यांच्या आदेशानुसार एका पोलिसाने अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. त्याच्या निषेध सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आला.आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिह्यातून धुळे प्रकरणाचा सोशल मीडियावर निषेध होत आहे.