स्पायडर मॅन प्रेंचाइजीमधील अभिनेता
हॉलिवूड कपल टॉम हॉलंड अन् जेंडया यांचे नाते आता विवाहात रुपातंरित होण्याची चर्चा आहे. स्वतःच्या रिलेशनशिपची घोषणा करून वर्ष उलटल्यावर टॉम अन् जेंडया आता विवाह करण्याचा विचार करत आहेत.
स्पायडर मॅन प्रेंचाइजीमध्ये एकत्र काम केल्यावर टॉम अन् जेंडाया रिलेशनशिपमध्ये आले होते. दोघांनी ‘स्पायडर मॅन ः नो वे होम’च्या प्रीमियरदरम्यान स्वतःच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली होती. दोघेही स्वतःच्या नात्याबद्दल अधिक बोलत नाहीत तसेच मुलाखतींदरम्यान वैयक्तिक गोष्टी मांडणे टाळतात.
दोघांनी भविष्याचा विचार करत विवाहाचे प्लॅनिंग चालविले आहे. मागील 6 वर्षांपासून स्वतःच्या कारकीर्दीवर लक्ष देत आहे. परंतु आता एक ब्रेक घेऊ इच्छितो आणि स्वतःचे कुटुंब निर्माण करण्याचा चार असल्याचे टॉमने एका मुलाखतीत म्हटले आहे.
जेंडयाच्या अनुपस्थितीत आमच्या रिलेशनशिपबद्दल मी बोलू शकत नाही. ही माझी नव्हे तर आमची कहाणी आहे. याबद्दल आम्ही एकत्रच बोलणार आहोत असे टॉमचे म्हणणे आहे.