ऑनलाईन टीम / टोकियो :
जपानची राजधानी टोकियोत आज भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल एवढी होती. तेथील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 09 मिनिटांनी हे धक्के जाणवले. त्यानंतर जपानच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 1 मीटरपर्यंत त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरातील मियागी परिसरात 60 किमी अंतरावर होता. या परिसरात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.