ऑनलाईन टीम / टोकियो :
जपानच्या ईशान्य भागात शनिवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल एवढी होती. सकाळी 8.14 मिनिटांनी टोकियोच्या ईशान्येस 407 किलोमीटर अंतरावर असलेल्या मियागी केनियोकी येथे हा भूकंप झाला. सुदैवाने या भूकंपाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
मियागी केनियोकी या ठिकाणी झालेल्या भूकंपाच्या केंद्राची नोंद 38.7 अंश उत्तर अक्षांश आणि 142.4 अंश पूर्व रेखांशावर 40 किलोमीटर खोलवर झाली.