वृत्तसंस्था/ मिलान
इटलीचा टेनिसपटू मॅटेव बेरेटेनीला स्नायू दुखापत झाल्याने त्याला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्याची माहिती इटलीच्या ऑलिंपिक समितीने दिली आहे.
बेरेटेनीला ही दुखापत लंडनमध्ये विंबल्डन स्पर्धेवेळी झाली होती. विंबल्डन स्पर्धेत बेरेटेनीने एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. या दुखापतीमुळे बेरेटेनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही.