वृत्तसंस्था/ टोरँटो
जुलै महिन्यात सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून कॅनडाचा पुरूष टेनिसपटू डेनिस शेपोव्हॅलोव्हने कोरोना महामारीच्या भीतीमुळे माघार घेतली आहे. एटीपीच्या क्रमवारीत शेपोव्हॅलोव्ह 12 व्या स्थानावर आहे.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धा 24 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल आणि ऑस्ट्रीयाचा थिएम यांनी गेल्या आठवडय़ात आपण सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. आता टेनिस या क्रीडा प्रकारात नदाल, थिएम आणि शेपोव्हॅलोव्ह हे टेनिसपटू सहभागी होणार नाहीत.