वृत्तसंस्था/ पॅरीस
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून विविध देशांच्या अनेक खेळाडूंना माघार घ्यावी लागत आहे. माघार घेणाऱया खेळाडूंच्या यादीमध्ये आता व्हिक्टोरिया अझारेन्काचाही समावेश झाला आहे.
बेल्जियमची माजी टॉप सिडेड तसेच 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया अझारेन्काने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महामारीने निर्माण झालेल्या आव्हानामुळे माघार घेतली आहे. तिच्या कुटुंबियांना जपानमध्ये प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे. मात्र माघारीचे नेमके कारण तिने स्पष्ट केलेले नाही. 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अझारेंकाने मॅक्स मिर्नयीसमवेत मिश्र दुहेरीचे सुवर्ण आणि एकेरीत कांस्यपदक मिळविले होते. स्वीसचा रॉजर फेडरर, स्पेनचा नदाल, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, ऑस्ट्रियाचा थिएम आणि जर्मनीची केर्बर यांनी यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. संभाव्य कोरोना महामारीच्या भीतीमुळे अझारेंकाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.