ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने खाते उघडले आहे. भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे.
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. तिने वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलून मेडलवर शिक्कामोर्तब केले. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.