टोकियो : भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डागरला टोकियो ऑलिम्पिकसाठी उशिरा प्रवेश मिळाला असून आता ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गोल्फ क्रीडाप्रकाराला 5 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चालू महिन्याच्या प्रारंभी निश्चित करण्यात आलेल्या अंतिम यादीमध्ये दीक्षा डागरचा राखीवमध्ये समावेश होता. आता या स्पर्धेसाठी सहभागी होण्याकरिता आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने भारतीय गोल्फ संघटनेला दीक्षा डागरला प्रवेश दिल्याची माहिती कळविली आहे. टोकियोमध्ये वेळेत दाखल होण्यासाठी भारतीय गोल्फ संघटनेला सर्व व्यवस्था तातडीने करावी लागेल. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या गोल्फ संघामध्ये दीक्षा डागर आणि आदिती अशोक यांचा समावेश आहे.