वृत्तसंस्था/ मुंबई
फ्रान्सची तेल व ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टोटलने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील 20 टक्के वाटा खरेदी करण्याचे ठरवले आहे. यानंतर शेअर बाजारात अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग 2 टक्के इतके खाली आले होते. 927 रुपयांवर समभागाचा भाव होता.
टोटल या योगे ऊर्जा क्षेत्रात पाय ठेवणार असून अदानी ग्रीन एनर्जीतील खरेदीनंतर संचालक मंडळात एक जागा टोटलला मिळणार आहे. यापूर्वी उभय कंपन्यांमध्ये एलएनजी या नैसर्गिक गॅसच्या क्षेत्रात 2018 मध्ये भागीदारी करार झाला होता. टोटलचे सीईओ पेट्रीक पौयान म्हणाले की, अदानीसोबतच्या सहभागामुळे आम्हाला भारतात उतरण्याचे भाग्य लाभत आहे. ऊर्जा क्षेत्रात कंपनीला एकत्र कार्य करण्याची संधी लाभणार असून चांगल्यात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.
टोटलसाठी भारतात गुंतवणूक महत्त्वाची ठरणारी असेल. भारतात ऊर्जा व नैसर्गिक वायूचा योगदानात महत्त्वाचा वाटा ठरतो आहे. टोटलने हिस्सेदारी खरेदी केल्याने कंपनीचे नाव आता अदानी टोटल गॅस असे होणार आहे. अदानीचा व्यवसाय विविध देशात विस्तारलेला आहे.