-केळी,रताळयासह फळांची आवक वाढली
प्रतिनिधी/कोल्हापूर
उपवास व सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फळांची आवक वाढली आहे. सणाच्या तोंडावरच पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. खजूरच्या दरात मात्र घसरण झाली आहे. बिनखांबी ते पापाची तिकटी येथील रस्ता वाहतूकींना बंद असल्याने, सणाच्या खरेदीसाठी येणाऱया कपिलतिर्थ येथील ग्राहकांना वाहनांचे पार्कींग नसल्याने, आपले ओझे घेण्याचा त्रास वाढला आहे.
खाद्यतेलाच्या दरात किलोमागे 10 रूपयांनी वाढ
दसरा,दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवडयात खाद्यतेलाच्या दरात 5 रूपयांनी घसरण झाली होती. यामुळे यंदाची दसरा,दिवाळी स्वस्तात होईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवसातच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. सणाच्या काळात खाद्यतेलाचा दर कमी होईल ही अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा 5 ते 10 रूपयांनी खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. मागच्या आठवडयातील खाद्यतेलाचा दर कंसात आहे. सरकी 160 (154), सुर्यफूल 165 (160), शेंगतेल 185 (175)
दसऱयासाठी कडाकणीची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. यासाठी शिवाजी मार्केट,लक्ष्मीपुरी, कपिलतिर्थ येथील किराणा दुकानामध्ये कडाकणी पीठ, रवा, मेदा, पिठीसाखर, लिसा साखर, हरभराडाळ, खोबरे आदी खरेदीसाठी गर्दी झालेली दिसत होती. सध्या तरी यांचे दर स्थिर आहेत.याचे दर पुढीलप्रमाणे (एक किलो व रूपये)कडाकणी पिठ-80, रवा-36, मैदा-32, पिठीसाखर -48, लिसा साखर -60, साखर-40, खोबरे-200, किसलेले खोबरे-210, हरभराडाळ-76, खडीसाखर-48 ते 80 रूपये.
उपवासासाठी रताळयाची आवक वाढली
नवरात्रीसाठी उपवास करणाऱयाकडून फळांची मागणी वाढत आहे. रताळे, केळी, सफरचंदसह इतर फळांची मागणी वाढली आहे. याचा दर 60 पासून 100 रूपये किलो आहे. मात्र डाळींब्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. 80 ते 120 रूपये असा दर झाला आहे. उपवासासाठी बाजारात रताळयाचे ढिग वाढले आहेत. मागील आठवडयापेक्षा या आठवडयात रताळयाचा दरात घसरण झाली आहे. 40 रूपये किलो असलेले रताळे आता 20 रूपये किलो झाले आहेत.
टोमॅटो 40 रूपये किलो
गेल्या आठवडयापासून पाऊस सुरू असल्याने भाज्या पालेभाज्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भाज्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. 40 ऐवजी 60 रूपयाच्या पुढे हा दर झाला आहे. या आठवडयात टॉमॅटो 15 ते 20 रूपयावरून 40 रूपये किलो झाले आहे. आवक कमी असल्याने हा दर वाढला असल्याचे टोमॅटो विक्रेत्Îाकडून सांगण्यात आले. पालेभाज्या सुध्दा 15 ते 20 रूपये झाल्या आहेत.