8 ते 11 लाखापर्यंत किंमत : अनेक वैशिष्टय़ांचा समावेश
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एसयूव्ही सेगमेंट अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरने नव्या अर्बन प्रुजरचे लाँचिंग भारतात केले आहे. टोयोटा अर्बन प्रुजर ही टोयोटा ग्लान्झा या प्रीमियम हॅचबॅकच्या भरघोस यशानंतर जागतिक टोयोटा-सुझुकी युतीच्याअंतर्गत भारतात लाँच केली जाणारी ही दुसरी गाडी आहे.
लाँचिंगवेळी टाटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाजु योशिमुरा, नवीन सोनी, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड सर्व्हिस आणि तदाशी असाजुमा, वाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड मार्केटिंग हेदेखील उपस्थित होते.
दमदार आणि आकर्षक रचनेसह ही गाडी सादर करण्यात आलीय. अर्बन प्रुजरची सुरुवातीची किंमत 8,40,000/- ते 11,30,000 (एक्स-शोरूम,दिल्ली)इतकी असेल. ऑटोमॅटिक प्रकारातील कारची सर्वोत्तम पेट्रोल इंधन कार्यक्षमता 18.76 किलो मीटर प्रति लिटर इतकी आहे. अर्बन प्रुजरवर 3 वर्षे किंवा एक लाख किलोमीटरपर्यंतची उत्कृष्ट वॉरंटीदेखील मिळेल.
नव्या अर्बन प्रुजरमध्ये नवीन शक्तिशाली के-सिरीज 1.5 लीटरचे चार सिलेंडरवाले पेट्रोल इंजिन आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशन (एटी) असे दोन पर्यायदेखील उपलब्ध आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सर्वोच्च वैशिष्टये आहेत. अर्बन प्रुजरमध्ये डय़ुअल एयरबॅग्स आणि ईबीडीसह एबीएस ऍडव्हान्स बॉडी स्ट्रक्चर इलेक्ट्रोक्रोमिक आईआरव्हीएम, ऑडिओमध्ये डिस्प्लेसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे.