नवी दिल्ली
2022 पर्यंत टोयोटा कंपनी 2 नव्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात उतरवणार आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 18 टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाजही कंपनीने वर्तवला आहे.कंपनीने अमेरिकेत 2020 मध्ये 3 लाख 37 हजार हायब्रिड वाहनांची विक्री केली असून यावर्षी या वाहनांच्या विक्रीत 20 टक्के वाढ होण्याचे संकेत कंपनीने व्यक्त केले आहेत. पुढच्या वर्षी कंपनी आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात आणणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने तयारीवर जोर दिला आहे. 2025 पर्यंत अमेरिकेत कंपनीच्या हायब्रिड वाहनांच्या विक्रीत 40 टक्के इतकी वाढ अपेक्षीत आहे.