नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑक्टोबर 2021 मध्ये 12 हजार 440 मोटारी विक्री केल्या आहेत. महिन्याच्या स्तरावर नोंदणीत 34 टक्के वाढ दिसली आहे. जपानमधील मूळच्या या कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये 9 हजार 283 कार्स विकल्या होत्या तर ऑक्टोबर 2020 मध्ये कंपनीने 12373 इतक्मया मोटारी विक्री केल्या होत्या. जानेवारी ते ऑक्टोबर 2021 या काळात वाहन नोंदणीत 78 टक्के वाढ नोंदली गेलीय.