नवी दिल्ली
ऑक्टोबरमध्ये अधिकाधिक चांगली वाहने बनविण्याच्या टोयोटाच्या कटिबद्धतेला दृष्टीसमोर ठेवून टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (टीकेएम) एसयूव्ही – लेजेंडरच्या नवीन 4 बाय 4 व्हेरिएंटचे अनावरण केले. द लेजेंडर पहिल्यांदा जानेवारी 2021 मध्ये नवीन टोयोटा फॉर्च्युनरसह 4 बाय 2 डिझेल प्रकारात लाँच करण्यात आली होती. परफॉर्मन्स लेजेंडरची संतुलित रचना आणि विविध ठळक पैलू आणि भविष्यातील गरज पूर्ण करणारे असे वाहन बनवत असल्याचा दावा यावेळी कंपनीने केला आहे. यामध्ये चारही कोपऱयांवर असलेले कॅटामरन घटक मजबूत व्यापक अस्तित्व दाखवून देत आहेत.