नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या फॉर्च्युनर कारच्या विक्रीला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. बाजारात दाखल केल्यानंतर 5 हजारहून गाडय़ांची विक्री करण्यात कंपनीला यश आलं आहे. फॉर्च्युनरची नवी आवृत्ती व लिजेंडर या गाडय़ा पाठोपाठ बाजारात दाखल केल्या गेल्या. फॉर्च्युनर, लिजेंडर बाजारात दाखल झाल्यावर आतापर्यंत 5 हजार 300 गाडय़ांची विक्री करण्याचा विक्रम केला आहे. सुव्ह गटातील ही गाडी लोकप्रिय ठरली आहे.तर दुसरीकडे याच गटातील इनोव्हा क्रिस्टालाही ग्राहकांनी पसंत केलंय.
मार्च 2021 मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने एकूण 15 हजार 1 मोटारी विक्री केल्या आहेत. मागच्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत विक्रीत 114 टक्के वाढ दिसली आहे.