कोलकाता
वाहन क्षेत्रातील कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने आगामी काळात आपल्या विविध प्रकारातील कार्सच्या किंमती वाढवणार असल्याची माहिती दिली आहे. सदरच्या कंपनीच्या कार्सच्या किमती 4 टक्के इतक्या वाढणार असल्याचे सांगण्यात येते.सदरच्या किंमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किंमती वाढवल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.