वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील बलाढय़ मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने स्पेनचा फुटबॉलपटू फिरेन टोरेसबरोबर पाच वर्षांचा नवा करार केला आहे. सदर घोषणा मंगळवारी या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी केली. टोरेस यापूर्वी व्हॅलेन्सिया क्लबचे प्रतिनिधीत्व करीत होता.
टोरेसबरोबर मँचेस्टर सिटी क्लबने हा करार करताना इतर माहिती गुपीत ठेवली आहे पण या करारापोटी मँचेस्टर सिटी क्लबला ट्रान्फसर फी म्हणून 27.10 दशलक्ष डॉलर्सची रक्कम द्यावी लागली असल्याची माहिती ब्रिटीश प्रसार माध्यमाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामामध्ये विविध स्पर्धांतून खेळताना टोरेसने व्हॅलेन्सियाकडून सहा गोल नोंदविले आहेत. व्हॅलेन्सियाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत नववे स्थान मिळविले होते.