उद्यमबाग येथील घटना
बेळगाव : राजारामनगर, उद्यमबाग येथे एका टोळक्मयाने कामगाराला बेदम मारहाण केली आहे. जखमी कामगारावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे.
सुभाष मोटार (वय 40, रा. मच्छे) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून सायंकाळी यासंबंधी फिर्याद देण्यात आली आहे. कामगारांना लक्ष्य बनविणाऱया टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार सुभाष हे पिण्याचे पाणी आणण्यासाठी सार्वजनिक नळावर गेले होते. त्यावेळी याच परिसरात उभ्या असलेल्या एका चौकडीने विनाकारण त्यांच्याशी भांडण करून त्यांना बेदम मारहाण केली. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.