वर्षात केवळ 6 महिने काम , उर्वरित 6 महिने निव्वळ भ्रमंती
ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे राहणारी एश्लिया ट्रकचालक म्हणून काम करते. ती वर्षभरात केवळ 6 महिने काम करते आणि उर्वरित 6 महिने जगातील विविध ठिकाणी फिरत असते. एश्लियाची कमाई ट्रकचालक म्हणून एवढी अधिक आहे की तिचे 6 महिने आलिशान टूर्स पूर्ण करत सहजपणे संपत असतात.
एश्लिया 6 महिन्यांपर्यंत ट्रक चालविल्यावर सहजपणे 60 लाख 25 हजार रुपयांपेक्षाही अधिक कमाई करते.
एश्लिया ही फ्लाय इन फ्लाय आउट वर्कर म्हणून काम करते. याच्या माध्यमातून कर्मचाऱयांना दुर्गम भागांमध्ये काही काळासाठी पाठविले जाते. एश्लियाने दुर्गम भागातील खाणीत कुठल्याही अनुभवाशिवाय काम करणे सुरू केले होते. यातून आपण 60 लाखांहून अधिक कमाई करत असल्याचे तिने टिकटॉकद्वारे सांगितले आहे.
एश्लिया दर तासाला 2,735 रुपयांचे उत्पन्न मिळविते. ट्रकचालक म्हणून पहिल्या वर्षी तिने सुमारे 51 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. आता तिने दर तासाच्या हिशेबाने ड्रायव्हिंगचा दर वाढवून 2,800 रुपयांपेक्षा अधिक केला आहे.
याचबरोबर तिची कंपनी तिला दर महिन्याला बोनस आणि लॉयल्टी रिवॉर्ड देखील देत. हा बोनस दर महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत असतो. तिने पहिल्याच वर्षी या दोन्ही प्रकारच्या बोनसमधून सुमारे 66 लाख रुपयांची कमाई केली.
मी 14 दिवसापर्यंत काम करते आणि पुढील 14 दिवस सुटीवर असते. या ठिकाणी वर्षात केवळ 6 महिने काम करावे लागत असल्याचे तिचे सांगणे आहे. सुटीमध्ये ऐश्लिया जगातील विविध ठिकाणी जात असते आणि त्याच्याशी निगडित ग्लॅमरस पिक्चर्स स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटद्वारे शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.