प्रतिनिधी / बेळगाव
भरधाव ट्रकची धडक बसून पादचारी वृद्ध जागीच ठार झाला. सोमवारी सायंकाळी प्रुटमार्केटजवळ ही घटना घडली असून वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
काकतीहून हलगाकडे जाणाऱया एमएच 09 ईएल 6991 क्रमांकाची ट्रकची धडक बसून सुमारे 60 ते 65 वषीय अनोळखीचा मृत्यू झाला आहे. प्रुट मार्केटजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
वाहतूक पोलिसांनी त्या वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सध्या मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. त्या वृध्दाने आपल्या अंगावर पांढरी खादी पॅन्ट, पांढरे शर्ट, खांद्यावर पांढरे टॉवेल परिधान केला होता. वरील वर्णनाच्या वृध्दा विषयी कोणाला माहिती असल्यास वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी पुढील तपास करीत आहेत.