वार्ताहर /खानापूर
बुधवारपासून दीपावलीचा सण सुरू असल्याने अनेक चाकरमानी आपल्या गावाकडे सणाच्या उत्सवासाठी परत येत आहेत. खानापूर तालुक्मयातील असोगा येथील एक युवक मंगळवारी रात्री पुण्याहून आपल्या घरी आला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास आपल्या रूम पार्टनर असलेल्या दुसऱया एका मित्राची बॅग देण्यासाठी असोग्याहून दुचाकीवरून खानापूरकडे येत असताना समोरून येणाऱया एका ट्रक्टरला जोराची धडक बसल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदर युवकाचे नाव कल्लापा बाबाजी पाटील (वय 19) असे असून तो विवाहित आहे. सदर युवक पुन्हा येथे जे पॉवर सोल्युशन कंपनीत वेल्डर म्हणून कामाला आहे.
दीपावली सण असल्याने तो मंगळवारी सायंकाळी आपल्या गावी आला होता. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास आपला दुसरा एक मित्र गावाकडे येत असल्याने त्याची बॅग देण्यासाठी तो खानापूरला जात होता. खानापूर-असोगा मार्गावरील मन्सापूर कत्रीजवळ ऊस वाहतूक करणारा रिकामी ट्रक्टर असोगा गावाकडे जात असता दुचाकी व ट्रक्टरची समोरासमोर धडक झाल्याने युवक कल्लाप्पा पाटील हा रस्त्याकडेला फेकला गेला. त्याच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. त्याला तातडीने खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखलही करण्यात आले. परंतु तोवर सदर युवकाचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी पंचनामा केला आहे. दुपारी शवविच्छेदनानंतर अंत्यविधी करण्यात आला.