ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एअरफोर्स वन हे विमान लँड होत असताना एक ड्रोनसदृश्य उपकरण विमानाला धडकणार होते. सुदैवाने मोठा अपघात टळला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 5.54 वाजता ट्रम्प यांचे एअरफोर्स वन हे विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी काळ्या आणि पिवळ्या रंगाचे ड्रोनसदृश्य उपकरण विमानाच्या उजव्या बाजूला धडकण्याच्या तयारीत होते. मात्र, सुदैवाने धोका टळला. यावेळी विमानात ट्रम्प यांच्यासह अनेकजण होते.
एअरफोर्सच्या 89 व्या एअरलिफ्ट विंगला या घटनेबाबत माहिती मिळाली असून, ते या घटनेचा तपास करत आहेत.