ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ आणि निवडणुकीच्या निकालाविरोधात वॉशिंग्टन डिसीमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
ट्रम्प निवडणुकीतील आपली हार मानायला अद्याप तयार नाहीत. मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा त्यांचा आरोप कायम आहे. अशातच निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रियेविरोधात किमान डझनभर खटले दाखल करण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे नव्या प्रशासनाकडून कार्यभार सांभाळण्यापूर्वी सत्तेचे सहज हस्तांतरण करण्यासाठी ट्रम्प यांच्यासाठी दबाव वाढत आहे.
बायडेन यांचा शपथविधी 20 जानेवारीला आहे. जनरल सर्व्हिसेस अॅडमिनिस्ट्रेशनवर बायडेन यांना निर्वाचित राष्ट्राध्यक्षच्या रुपाने औपचारिक मान्यता देण्याची जबाबदारी ट्रम्प यांच्यावर आहे. त्यानंतरच हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, निवडणूक निकालावर ट्रम्प यांचा आक्षेप कायम असून, त्यांचे समर्थकही आता निकालाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.