वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध मोठा कट रचला गेला आहे. त्यांना विषाचा एक लिफाफा पाठविण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. हा लिफाफा कॅनडाहून पाठविला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा यंत्रणांना हा लिफाफा संशयास्पद वाटल्यामुळे चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये रिसिन नावाचा विषारी पदार्थ सापडला. याची पुष्टी करण्यासाठी तपास अधिकाऱयांनी पॅकेजची पुन्हा तपासणी केली. रिसिन हा अत्यंत विषारी पदार्थ आहे जो दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरला गेला आहे. व्हाईट हाऊसमध्ये येण्यापूर्वी सर्व लिफाफे व्यवस्थितरीत्या तपासले जात असल्यामुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.