वनस्पती तूप अर्थात डालडय़ात असणारे ट्रान्सफॅटी ऍसिड हे केवळ हृदयाला धोकादायक नाहीत तर त्याचे अन्यही अनेक तोटे आहेत.अलिकडे झालेल्या काही अभ्यासात डालडय़ात ट्रान्स फॅटीचे प्रमाण 40 ते 50 टक्के असल्याचे आढळून आले आहे.
- सॅच्यूरेटेड फॅटी ऍसिड (एसएफए) हे आपल्या शरिराला हानीकारक असतात. त्यांमुळे एलडीएल म्हणजेच बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ‘एसएफए’चे प्रमाण कमी असेल तर ते खाद्यपदार्थ हानीकारक ठरत नाही. जसे की खोबर्याचे शुद्ध तेल. या तेलाचा वाईट परिणाम सीरम लिपिडवर होत नाही.
- याउलट डालडय़ात असलेले ट्रान्स फॅटी ऍसिड हे सीरम लिपिडला नुकसान पोचवते. हा थेट हृदयावर हल्ला करतो. स्तनाचा कर्करोग होण्याचे हे एक प्रमुख कारण मानले जाते.
- डालडय़ाच्या सेवनामुळे गर्भात विकसित होणार्या बाळाच्या डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. शरिराच्या आत पॉलिऍनसॅच्यूरेटेड फॅटी ऍसिड असते. ते बाळाच्या डोळ्याच्या क्षमतेचा विकास करत असते. परंतु गरजेपेक्षा अधिक ट्रान्स फॅटी ऍसिडचे सेवन केल्यास ते पॉलिअनसॅच्यूरेटेड फॅटी ऍसिडला रोखण्याचे काम करते. या कारणांमुळे बाळाच्या डोळ्यावर परिणाम होतो.
- अधिक प्रमाणात ट्रान्स फॅटी ऍसिडयुक्त खाद्य पदार्थांच्या सेवनाने वजन आणि लठ्ठपणा वाढतो. मेंदूवर विपरित परिणाम होतो. याने मेंदूच्या कार्यात अडचणी येतात. परिणामी अल्जायमर, स्मृतिभ्रंश, नैराश्य आदींचा धोका निर्माण होतो.
- ट्रान्स फॅटमुळे ऍलर्जीची समस्या देखील निर्माण होते. यात अस्थमा, एक्झिमा, कोल्ड यासह अन्य समस्यांचा समावेश आहे.
- एका अभ्यासानुसार शरिरातील ट्रान्स फॅटचे अधिक प्रमाण हे इंफ्लेमेंटरी सायटोकिन्स वाढवण्यास हातभार लावते. ज्या मंडळीच्या पोटावर चरबी आहे, त्यांना ट्रान्स फॅटमुळे मधुमेह, एडिमा, ऑटोइम्यून आणि सूज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.