करंजे येथील घटना : ऍल्युमिनियम वायडिंग व ऑईल चोरी
प्रतिनिधी / सातारा
साताऱयातील करंजे परिसरातील रानमळा येथे एका शेतकऱयाच्या शेतातील पोलवर विक्रांत इंजिनिअरींग अँड एप्झिम प्रा. लि. कंपनीतर्फे बसवण्यात आलेला ट्रान्सफॉमर खाली पाडून त्यातील अल्युमिनियम वायडिंग व ऑईल असा एकूण 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालीय.
याबाबत विक्रांत इंजिनिअरींग कंपनीतील इंजिनिअर संग्राम पवार यांनी तक्रार दिली असून त्यांच्या कंपनीमार्फत करंजे रानमळा येथील शेतकरी मनोज बळीराम पांडेकर यांच्या शेतात सिमेंट पोल उभे करुन श्रीकृष्ण सुदर्शन उर्जा कंपनीचा ट्रान्सफॉर्मर दि. 23 मार्च रोजी बसवला होता.
दि. 5 रोजी अज्ञात चोरटय़ांनी पांडेकर यांच्या शेतातील पोलवरील ट्रान्सफॉर्मर खाली पडला. त्यातील 80 हजार रुपये किंमतीची अल्युमिनियम वायडिंग व ऑईल चोरुन नेल्याची ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून पोलीस या चोरीचा अधिक तपास करत आहेत.