नवी दिल्ली
दुचाकी क्षेत्रातील ब्रिटनमधील नामांकीत कंपनी ट्रीम्पने आपली नवी ‘बोनविले बॉबर’ ही मोटारसायकल नुकतीच भारतीय बाजारात लाँच केली आहे. प्रिमीयम गटातील या मोटारसायकलीची किंमत 11.75 लाख रुपये असणार असल्याचे कंपनीने सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या मोटारसायकलला देण्यात आली आहे. ट्रीम्पच्या बॉबरला भारतीयांनी आधीपासूनच खूप चांगला प्रतिसाद दिला असल्याचे ट्रीम्प मोटारसायकल्स इंडियाचे व्यवसाय प्रमुख शोएब फारूक यांनी सांगून पुन्हा एक वर्षाच्या कालावधीत याची नवी आवृत्ती सादर होत आहे.