अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे अज्ञात चालकाने वेगात ट्रॅक्टर चालवून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला जोरात धडक दिल्याने १६ वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि २८ रोजी सुलतानपूर ता. अक्कलकोट पासून एक किमी अंतरावर ट्रॅक्टर क्र. एम. एच. २५ ए. एस. ९३३६ या गाडीवर काम करत असलेला गणेश महादेव मिसाळे वय १६ रा. सराटी ता. तुळजापूर यास ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर वेगात चालवून व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बाजूला असणाऱ्या झाडाला जोरात धडक देऊन पळून गेला. या अपघातात गणेश महादेव मसाळे वय १६ याला नाक तोंड व छातीला जबर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद पद्माकर मिसाळे दिले असून अज्ञात चालकावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप. नि. मुजावर हे करीत आहेत.