जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील वळसंग पासून एक किलोमीटर अंतरावर शनिवारी सकाळी सात वाजता उसाचा ट्रॅक्टर व मोटर सायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अथणी तालुक्यातील अनंतपुर येथील शिक्षक लक्ष्मण पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जत व अथणी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील उटगी येथील लक्ष्मण पवार वय 45 हे अनंतपूर येथील कन्नड शालेय प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होते. ते शनिवारी सकाळी आपल्या उटगी गावातून सकाळी आनंतपुर कर्नाटककडे जात असताना सकाळी 6:00 वाजता हा अपघात झाला. जत कारखानासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असताना समोर मोठा वळण असल्याने ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटून समोरच्या लक्ष्मण पवार यांच्या टू व्हीलर वरती जोरात धडक दिली. त्यामुळे पवार हे जागीच ठार झाले. हा अपघात इतका गंभीर होता की, टॅक्टर सुमारे 150 फुट रस्ता सोडुन तो रानात जाऊन थांबला. दरम्यान, या घटनेनतर टॅक्टर ड्रायव्हर पसार झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली आहेत .