ऑफिसमध्येही स्टायलिश दिसण्यासोबतच फॉर्मल लूक कॅरी करणं आवश्यक असतं. त्यातच कपडय़ांमध्ये वावरताना आरामदायीही वाटायला हवं. ऑफिसवेअरमध्ये भारतीय पेहरावापासून पाश्चिमात्य पेहरावापर्यंत बरेच पर्याय आहेत. तुम्हीही तुमच्या सोयीनुसार तसंच आवडीनुसार कपडय़ांची निवड करू शकता. ऑफिसमध्ये कोणती फॅशन करता येईल याविषयी…
- कॉर्पोरेट जगतात वावरणार्या महिला टय़ूब स्कर्ट आणि फॉर्मल शर्टची निवड करू शकतात. हा पर्याय स्टायलिश तर आहेच शिवाय या प्रावरणांमध्ये तुम्हाला आरामदायीही वाटेल.
- कुर्ता हा ऑल टाईम फेवरिट पर्याय आहे. बाजारात ऑफिसवेअर कुर्ते मिळतात. हे कुर्ते चुडीदार, लेगिंग्ज,पँट, पलाझोसोबत कॅरी करता येतील. भारतीय पेहरावांमध्ये कुर्ता सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
- सध्या पँट्सची फॅशन आहे. फॉर्मल ट्राउझर्सपासून कॉटन पँटपर्यंत बरंच काही उपलब्ध आहे. अशा पँटवर फॉर्मल शर्ट किंवा स्टायलिश टॉप घालता येईल.
- शॉर्ट ड्रेस हा सुद्धा चांगला पर्याय आहे. ऑफिससाठी शॉर्ट ड्रेसची निवड करत असाल तर फिकट आणि सौम्य रंगांना पसंती द्या. गदड किंवा भडक रंग ऑफिसमध्ये चांगले दिसणार नाहीत.
- ब्लेझर्स किंवा जॅकेट्सही घालता येईल. ऑफिस मीटिंगला जाताना अनेकजणी ब्लेझर घालतात. मात्र हा लूक दररोज कॅरी करता येऊ शकतो. ब्लेझर तसंच जॅकेटमध्ये तुम्ही प्रोफेशनल दिसाल.