ऑनलाईन टीम / पटना :
बिहारची राजधानी पाटणा येथून नवी दिल्लीला निघालेल्या तेजस राजधानी एक्सप्रेसमध्ये चक्क एक आमदार अंतर्वस्त्रात फिरत होते. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित आमदाराने स्पष्टीकरण दिले आहे.
बिहारचे जदयूचे आमदार गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर आणि बनियनवर टॉयलेटमध्ये गेले. ट्रेनमध्ये महिला प्रवाशी असल्याचे भान मंडल यांना नव्हते. त्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यावेळी मंडल यांनी प्रवाशांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. वाद वाढल्यामुळे ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आरपीएफ टीमने पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शनवरील रेल्वे पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने हा वाद निवळला.
या प्रकारावर आमदार मंडल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘माझं पोट खराब झाले होते. त्यामुळे मी बनियन आणि अंडरवेअरवर ट्रेनमधील टॉयलेटमध्ये गेलो. मी जे बोलते ते खरं बोलतो, खोटं बोलत नाही.’